श्री व सौ राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आरती देसाई साहेब यांची भेट घेतली

सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती मधील व्यावसायिक सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या समवेत भेट घेतली.

*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा सुध्दा केली, आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी इमारती व जागे संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली.

*यावेळी निवेदन सादर करण्यात आले, तसेच सौ व श्री ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन ,निवासी जिल्हाधिकारी आरती देसाई साहेब यांचा सन्मानित केले, तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

*या निवेदनात असे म्हटले आहे की, कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप्पर सुध्दा कोसळून पडले आहे.

*तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे, या मध्ये एकुण 13 + पहिल्या मजल्यावर 3 + 1 पत्रा शेड असे एकूण 17 गाळे धारक आहेत. त्याचप्रमाणे 36 खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत. तसेच महसूल च्या जागेत 11 खोके धारक आहेत. त्याचप्रमाणे 10/15 वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे व्यवसाय करत आहेत , त्यांचा ही विचार केला जावा.

तरी आपणास विनंती आहे की आपण प्रत्यक्षात पाहणी करून, शासन दरबारी आम्हा व्यावसायिकांच्या व्यथा मांडण्यात लवकरात लवकर या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणी करावे, आणि आम्हाला नवीन व्यापारी संकुलामध्ये समाविष्ट करून घ्यावे, ही नम्र विनंती आहे.

*या निवेदनात असे हि नमूद केले आहे की, आम्ही नवीन होणाऱ्या संकुलात, नवीन नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम, नव्याने लागू होणारे भाडे भरण्यास तयार आहोत. आपल्या व्यस्त शेड्यूल मधून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी भेटी करीता वेळ दिल्याबद्दल, तसेच सविस्तर माहिती जाणून घेतल्याबद्दल श्री व सौ राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत,

error: Content is protected !!