भारतीय डाक विभागाअंतर्गत गोळवण येथे विशेष आधार कार्ड शिबिर संपन्न

आधार कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत प्रशासक शरद मांजरेकर यांच्या विशेष सहकार्याने शिबिर झाले संपन्न

   भारतीय डाक विभागाअंतर्गत विशेष आधार कार्ड शिबिराचे आयोजन गोळवण-कुमामे-डिकवल परिसरातील नागरिकांसाठी गोळवण ग्रामपंचायत हाॅल येथे करण्यात आले होते.या शिबिरासाठी गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत चे प्रशासक शरद मांजरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले होते. 

आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा असुन तसेच शासकीय कामासाठी आधार कार्ड लागतेच, आधार कार्ड काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात या सर्व बाबींचा विचार करून भारतीय डाक विभागाअंतर्गत आणि श्री.शरद मांजरेकर यांच्या विशेष सहकार्याने परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट तसेच नवीन आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील असंख्य नागरिकांनी सदरील शिबीराचा लाभ घेतला.
याप्रसंगी गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत चे प्रशासक शरद मांजरेकर यांनी सांगितले की, प्रत्येक शासकीय कार्यालयात आधार कार्डची आवश्यकता असते तसेच आधार कार्ड अपडेट करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची अडचणी लक्षात घेऊन गोळवण-कुमामे-डिकवल परिसरातील नागरिकांसाठी तसेच शालेय व कॉलेज विद्यार्थी यांच्यासाठी भारतीय डाक विभागाने विशेष आधार कार्ड शिबीर हेड पोस्टमास्तर वैजयंती तारापुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले त्याबद्दल डाक विभागाचे श्री.मांजरेकर यांनी आभार मानले.
यावेळी गोळवण-कुमामे-डीकवल ग्रामपंचायत प्रशासक शरद मांजरेकर,ग्रामसेविका सौ.मनवर मॅडम,पोस्ट कर्मचारी अंतरा जाधव, दिशा परब,माजी उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी करूणा राणे,बाळाराम परब, रामकृष्ण नाईक, कोमल मांजरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!