पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास

वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका

ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे

अशा कुठल्याही प्रकल्पा बद्दल अजून प्रशासनाला माहिती नाही

मात्र परदेशी शक्ती भारत विरोधी काम करत आहेत.

देवगड : देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथे पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले, “देवगड हे एक कुटुंब आहे. भविष्यात कोणताही प्रकल्प प्रस्तावित असेल, तर सर्वांना विश्वासात घेऊन त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. स्थानिक नागरिकांना जे योग्य वाटेल आणि देवगडच्या जे हिताचे असेल, तीच आमची भूमिका असेल.”
सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर, खोटे व दिशाभूल करणारे संदेश पसरवून नागरिकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. “ज्यांच्या मनात कोणतीही शंका असेल, त्यांनी थेट सरकार म्हणून माझ्याशी किंवा जिल्हाधिकारी आमच्याशी प्रशासन म्हणून संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे ही आवाहन पालकमंत्री नितेश राणे त्यांनी केले.

नामदार राणे म्हणाले की, “सध्या देवगडमध्ये कोणता प्रकल्प येणार आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडेही नाही. अणुऊर्जा प्रकल्प येत असल्याच्या चर्चाही पूर्णपणे निराधार आहेत.असा प्रकल्प मी देवगड मध्ये येऊ देणार नाही.
पुढे ते म्हणाले, “देशविरोधी आणि परदेशी शक्ती विविध अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्यासाठी अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, देवगडच्या जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. देवगडच्या पर्यावरणाचे व हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.” असेही यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!