१९ जून ते ३० जून या कालावधीत शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात
कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांना आव निवेदन सादर केल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रमोदजी कामत साहेब यांनी आपले निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.व अधिकाऱ्यांना निर्देशित केले.याची दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन गटशिक्षणाधिरी यांना निर्देश दिले.त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांना सांगून अंगणवाडी देखील सकाळच्या सत्रात भरण्यासंदर्भात सूचना केली.यादेखील सूचनेचे पालन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपक्ष जिल्हा परिषद सदस्य असून देखील जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची सेवा करणार नेता असे गौरवोद्गार पालक व शिक्षक यांच्याकडून आभार मानत व्यक्त केले जात आहे.