ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा..
कुडाळ : मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा विषय होता कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे (कविलकाटे) येथिल बहुतांश भागातील ग्रीन झोन आमदार निलेश राणे यांनी ऊठविल्या बद्दल समिल जळवी यांनी मानले आभार..
गेली कित्तेक वर्षे कुडाळ शहरातील कविलकाटे नगरपंच्यायत हद्दीतील कविलकाटे १. नंबर वॉर्ड मधील शेतकरी आणि नागरीकांची प्रमुख्याने आग्रहाची अशी मागणी असलेला ग्रीन झोन हा उठाव अशी मागणी होती.यासाठी सामाजिक सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार समिल जळवी हे गेली दोन वर्षे या ग्रीन झोन उठावा यासाठी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना भेटून लेखी निवेदने देऊन पाठपुरावा केला होता, मात्र यश आलं नव्हत त्यानंतर कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे हे आमदार झाल्यानंतर त्यांना तीन वेळा वेगवेगळ्या स्वरूपाची लेखी निवेदने देऊन आणि आणि गेल्या वर्षभरात आमदार निलेश राणे यांना सातत्याने भेटून वेळोवेळी ग्रीन झोन उठवण्यासाठी मागणी समिल जळवी यांनी केली होती आणि त्याचा पाठपुरावा देखील केला होता. आणि लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल च्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी कविलकाटे येथिल ग्रीन झोन संदर्भात आवाज उठवून बातम्या प्रसिद्धीस आणून शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते.या सर्वच गोष्टींची दखल घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कविलकाटे भागातील बराचसा ग्रीन झोन उठला आहे.
हा ग्रीन झोन उठल्यामुळे नागरिकांनी समाधान वेक्त केले आहे.जास्तीत जास्त प्रमाणात उठवून सहकार्य केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले.आणि उर्वरित राहिलेल्या काही भागातील जमिनीवरील ग्रीन झोन उठवण्याची हमी त्यांनी दिली त्यासाठी नागरिकांच्या माध्यमातून ज्यांच्या भागात ग्रीन झोन किंवा बाधित झोन आहे त्यांनी 8 जुलै पूर्वी हरकती घेऊन त्याचे नगरपंचायत कार्यालयात हरकती घेण्यासाठी अर्ज सादर करा मग राहिलेल्या भागातील त्रुटी काढून देऊ असे देखील आमदार निलेश राणे यांनी सांगितले.या भागातील ग्रीन झोन ऊठविल्यामुळे कविलकाटे भागातील नाकरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे कित्तेक वर्षे या भागात लागुन राहिलेला ग्रीन झोन उठल्यामुळे आपण नागरिकांच्या अडचणी कमी केल्या आहेत असेच आपण यापुढेही या विभागातील अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करत राहावे असे समिल जळवी यांनी त्यांची कुडाळ येथिल एका कार्यक्रमात भेट घेतली तेव्हा त्यांना निवेदन देत ते बोलत होते.


Subscribe










