कणकवली टेंबवाडी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा

कणकवली : कणकवली टेंबवाडी परिसरातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत कणकवली नगरपंचायतीने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आणि वाहतुकीसाठी मार्ग खुला करून दिला.

या कारवाईबद्दल कणकवली नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष संदेशजी पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील तसेच नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचे टेंबवाडीतील नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

नगरपंचायतीच्या तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. सार्वजनिक हिताला प्राधान्य देत प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी टेंबवाडीतील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी प्रशासनाने अशाच प्रकारे कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच या जनहिताच्या कार्याबद्दल टेंबवाडीतील समस्त नागरिकांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी ,नगरसेवक व नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!