पॅकेजिंग युनिट घटकासाठी अर्ज सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी : सन २०२६-२७ कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेंतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणेसाठी काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, पॅकेजिंग युनिट घटकासाठी अनुदान देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता भौतिक १ चा लक्षांक प्राप्त झालेला आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक अर्जदारांनी आपले अर्ज २५ जून २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
या काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, पॅकेजिंग युनिट यावर प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ३३ टक्के किंवा २५ लाख जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करणेत आलेली आहे. सदर बाब हि बँक कर्जाशी निगडीत असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार, पतसंस्था, कंपनी व संघ सदर बाबींचा लाभ घेण्यास पात्र राहील. शेतकरी उत्पादक संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था व शेत्कारू उत्पादक कंपनी यांचे मागील २ वर्षांचे ऑडीट अहवाल सादर करणे आवश्यक आहेत. शेतकरी उत्पादक संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था व शेत्कारू उत्पादक कंपनी यांचे ७/१२, ८ अ सादर करणे आवश्यक आहे. वैयक्तिक अर्जदारांनी त्याच्या नावाचा ७/१२, ८ अ सादर करणे आवश्यक आहे. वैयक्तिक अर्जदार यांचे वय २१ वर्षे पूर्ण असावे. (एका कुटुंबातील स्वत्तः, पती/पत्नी व अविवाहित मुले केवळ एकाच व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल.


Subscribe








