SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे आणि आंबडोस ग्रामपंचायत यांचा संयुक्त आरोग्य उपक्रम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबडोस ग्रामपंचायत आणि SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांविषयी सविस्तर जनजागृती व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विशाल पाटील (OBGY & Gynaecology) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांच्या आरोग्य समस्या, त्यांची लक्षणे आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार त्यांना योग्य उपचार व पुढील वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

या आरोग्य शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावकऱ्यांनी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल टीम तसेच SSPM लाईफटाईम हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

error: Content is protected !!