पिता – पुत्रांवर गुन्हा दाखल
देवगड येथील घटना
देवगड : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव खाजणवाडकर (वय ६०, रा. लिंगडाळवाडी, कोटकामते) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलत भाऊ राकेश पुंडलिक खाजणवाडकर व त्यांचा मुलगा अमन राकेश खाजणवाडकर यांच्याशी जमिनीच्या मोजणी व मालकीच्या वादावरून मतभेद सुरू आहेत.
शनिवार, ६ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे खेकडे शोधण्यासाठी घराजवळील पायवाटेने गेले मात्र त्यानंतर त्याच वाटेने परत येत असताना आरोपींनी त्यांना अडवले. जमिनीच्या वादावरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने लोखंडी रॉड ने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डाव्या खांद्याला, दंडाला तसेच उजव्या व डाव्या पायाला दुखापत झाली. आरोपींनी “तुझी वाटच पाहत होतो अशी धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
जखमी अवस्थेत त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, देवगड येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे रेफर करण्यात आले.
या प्रकरणी देवगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), १२६(२), ३ (५), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस सुरू आहे


Subscribe










