ओटवणे : येथे महिंद्रा पिकअप आणि प्लेजर दुचाकी यांच्यात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरमळे कुंभारवाडी येथील सौ. सीमा सचिन तळवडेकर (४२) यांचे बुधवारी पहाटे गोवा -बांबोळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने तळवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सरमळेवासीयांनाही धक्का बसला आहे.सरमळे कुंभारवाडी येथील आदिराज सचिन तळवडेकर हा मंगळवारी दुपारी प्लेजर दुचाकीने आई सीमा सचिन तळवडेकर हिला सोबत घेऊन सावंतवाडी येथून आपल्या सरमळे गावी येत होता. याचवेळी जयसिंगपूर कोल्हापूर येथील विजय रावसाहेब मगदूम हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो घेऊन सरमळे येथून सावंतवाडी येथे जात होते. या दोन्ही गाड्या कापईवाडी – देऊळवाडी सीमेदरम्यानच्या धोकादायक वळणावर आल्या असता दोन्ही गाड्यांमध्ये चालकाच्या बाजूने जोरदार धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील सीमा तळवडेकर यांचा पाय हाडातून कापला गेला तर दुचाकी चालवत असलेल्या आदिराज तळवडेकर याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गंभीर जखमी मायलेेकाला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन्ही पाय निकामी झालेल्या सीमा तळवडेकर यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले. या गंभीर अपघाताचा सीमा तळवेकर यांना प्रचंड मानसिक धक्काच बसला. त्यात बुधवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्या माजगाव उद्यमनगर येथे कामाला होत्या. त्यांच्या अकाली निधनाबाबत सरमळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केसरी येथील के. एस. आर एक्वेरियमचे सुपरवायझर सचिन तळवडेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.

ओटवणे येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109

Subscribe









