मेढा निवती सागर किनाऱ्याची ‘ब्लू फ्लॅग” मानांकनासाठी निवड

परुळे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने नटलेला आणि पर्यटनाचं नंदनवन असलेला जिल्हा आहे.कोकणातील पर्यटन स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे गळ्यातील माणिक मोत्यांचा हार आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून एक मानाचा मुकुट मिळाला आहे. तो म्हणजे मेढा निवती सागर किनाऱ्याची ‘ब्लू फ्लॅग” मानांकनासाठी निवड झाली आहे. त्यामुळे या भागाची केंद्र सरकारच्या समितीने घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. या समिती मध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अप्पर सचिव संजय सदानशीव, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटी कोस्टल अधिकारी रुपेश महाले, प्रदूषण महाराष्ट्र कंट्रोल बोर्डचे श्री पाटील यांचा समावेश होता.

येथील समुद्रकिनारा आणि पर्यटन दृष्ट्या सुंदर असा भाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.कोकणातील सागर किनारे अतिशय स्वच्छ व सुंदर आहेत. त्यातच वेंगुर्ले तालुक्यातील निवती सागर किनारा हा अतिशय सुंदर आहे. त्यामुळे येथे ब्लू फ्लॅग हा प्रकल्प राबविण्यात याव यांसाठी ग्रामपंचायत ने प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते. त्या अनुषंगाने सादर भागाची पाहणी करण्यासाठी शासनाकडून ही समिती आली होती.यावेळी त्यांनी या भागाची पाहणी केली. या भेटी दरम्यान गावचे सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच गोविंद. जाधव, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, मंडळ अधिकारी कांबळी, ग्रामसेवक शरद शिंदे. यासह ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. या ब्लू फ्लॅग योजनेत निवड झाली तर किनारी भागातील विकासाला चालना मिळेल तसेच पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.दरम्यान यावेळी बांधकाम विभाग कुडाळचे कुलांगे. अभियंता महाडेश्वर सर्कल कांबळी, तलाठी मेढा, जाधव, भूमी अभिलेखचे कदम, अशोक सारंग, कमलेश मेथर, पोलीस पाटील योगेश सारंग व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!