कणकवलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी;

संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमुळे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

कणकवलीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर यांनी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच संदेश पारकर यांच्या मिरवणुकीदरम्यान आ. निलेश राणे यांचे फोटो देखील झळकावण्यात आले होते. अशातच संदेश पारकर यांनी घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून संदेश पारकर मोठा निर्णय घेणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच त्यांच्यासोबत ठाकरे सेनेचा अजून एक बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

error: Content is protected !!