गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब
वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण
कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले असल्याने आज त्याठिकाणी नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक हे कणकवली तहसील कार्यालयात गेले असता त्याठिकाणी रांगेत नागरिकांची होणारी गैरसोय पाहून वैभव नाईक चांगलेच संतप्त झाले. गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना त्यांनी कडक शब्दांत याचा जाब विचारला. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जातो असे नागरिकांनी सांगताच त्यावर वैभव नाईक यांनी रांगेत असलेल्या सर्वांची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही असा इशारा दिला.
प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांची एवढी मोठी रांग लागूनही कणकवलीचे तहसीलदार केबिन मध्ये बसून ए.सी. ची हवा घेत आहेत. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत असे त्यांना वाटत नाही. असे सांगत वैभव नाईक यांनी तहसीलदारांवर नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्रे व दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत थांबावे लागता कामा नये. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना श्री. पावसकर यांना त्यांनी दिल्या. तुम्ही काय उपाययोजना केली हे पाहण्यासाठी मी पुन्हा ३ वाजता याठिकाणी येणार असल्याचेही वैभव नाईक यांनी सांगितले. वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळ पर्यंत पूर्ण करून देण्यात आले. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार मात्र शेवटपर्यंत गर्दीच्या ठिकाणी परतले नाहीत त्याबद्दल नागरिकांनीही तहसीलदारांवर रोष व्यक्त केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले,कणकवलीत अनेक गावातून प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रे करण्यासाठी आज कणकवली तहसील कार्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून मोठ्या संख्येने नागरिक रांगेत उभे आहेत. आणि हि रांग शौचालयाचा बाजूला ठेवल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढी मोठी रांग असूनही कणकवलीचे तहसील मात्र केबिन मध्ये बसून ए.सी. ची हवा घेत आहेत.सेतू सुविधा केंद्राचा व्यवस्थापक देखील ए.सी. मध्ये बसला होता.महसूल विभागाकडून दाखले व कागदपत्रांची घरपोच सेवा देणार असे सांगितले जाते परंतु तहसील कार्यालयात येणाऱ्यांना चार चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. महसूल विभागाने आधी हि परिस्थिती सुधारली पाहिजे. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जातो असे नागरिक सांगत आहेत मात्र रांगेत असलेल्या सर्वांची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही असा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिला.
1
/
108
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
1
/
108


Subscribe








