चलो सातारा… चलो सातारा… चलो सातारा…

येत्या 14 ऑक्टोबरपासून राज्यभरात समाज परिवर्तन मार्चचे आयोजन

सातारा येथून होणार प्रवर्तन मार्चला सुरुवात

सिंधुदुर्गात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड चवदारतळे सत्याग्रहाला महाड क्रांतीला यंदा 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाड चवदारतळे क्रांतीचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती चे द्विशताब्दी वर्ष याचे औचित्य साधुन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 14 ऑक्टोंबर पासुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समाज समता मार्च चे आयोजन करीत असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. कोल्हापुरात आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ना. रामदास आठवले बोलत होते..

येत्या दिनांक 14 ऑक्टेंबर 2026 रोजी सकाळी सातारा येथुन समाज परिवर्तन मार्चचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

त्यानंतर कोल्हापुर येथे 14 ऑक्टोंबर 2026 रोजी संध्याकाळी कोल्हापुर येथे भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर समाज परिवर्तन मार्च हा सातारा, कोल्हापुर, सांगली, सोलापुर मार्गे संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, करुन 18 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यामध्ये या समाज परिवर्तन मार्चचा समारोप करण्यात येणार आहे अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केली. या परिवर्तन मार्चला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!