भरधाव कारची दुचाकीला धडक

युवक गंभीर जखमी

जखमीला तिथेच टाकून कारचालकाचे पलायन

सावंतवाडी : कोल्हापूर येथील पर्यटकांच्या भरधाव कारने धडक दिल्याने कारीवडे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री साडे दहा वाजता माडखोल-सापळे स्टॉप येथे घडला. कॅल्व्हिस्टर उर्फ कॅलू गोन्स (वय ३३) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपचे युवा कार्यकर्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कारचालक कोल्हापूर येथील असून अपघातानंतर त्यांनी पलायन केले आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत असलेला कॅलू हा घटनास्थळी रस्त्यावर पडून राहिला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. संबंधित गाडीमध्ये दारूच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे चालक व सहकारी दारू पिलेले असावे, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने संबंधित तरुणांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!