कुडाळ शहरातील नालेसफाईचे काम अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या विशेष सूचना

कुडाळ : कुडाळ शहरातील नालेसफाई व गटार सफाईचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून याबाबत कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी विशेष सूचना केल्या होत्या.

येत्या काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच कुडाळ नगरपंचायतीने नालेसफाई व गटार सफाईचे काम हाती घेतले आहे. अनेकदा या नाल्यात अडकलेल्या कचऱ्यामुळे पुराचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा गटारांच्या पाईपमध्ये प्लास्टिक, कचरा आणि गाळ अडकून पाईप चोकप होतात. सामान्य माणसांना हे पाईप स्वच्छ करणे शक्य नसल्याने emergency response sanitation unit (स्वच्छता शीघ्रकृती दल) यांच्या व्हॅनच्या मदतीने हे चोकप झालेले पाईप स्वच्छ करण्यात आले.

पावसाळ्यात भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार सफाईचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या होत्या. आज अखेर नालेसफाईचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या ३ ते ४ दिवसात शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण होईल अशी माहिती नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी दिली आहे. तसेच शहरात कोणाला नालेसफाईचे काम करून घ्यावयाचे असल्यास कुडाळ नगरपंचायतशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

कुडाळ नगरपंचायतीने राबवलेल्या या नालेसफाईच्या मोहिमेमुळे पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पुराच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. या कामाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!