घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश

दिनेश वारंग यांनी मानले आ. निलेश राणे व दीपक नारकर यांचे आभार

कुडाळ : घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश करून घेतल्याबद्दल घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी आमदार निलेश राणे व जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांचे आभार मानले.

घावनळे गावची लोकसंख्या ३ हजारापेक्षा जास्त असल्याने घावनळे ग्रामपंचायतचे नाव नागरी सुविधामध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांच्याकडे केली होती. याबाबत शनिवारी कुडाळ पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत दीपक नारकर यांनी आ. निलेश राणे यांना विनंती केली. यावेळी आ. निलेश राणे यांनी घावनळे ग्रामपंचायत नागरी सुविधामध्ये समाविष्ट करण्याबाबत ठराव घेऊन लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश दिला.

आमदार निलेश राणे यांच्या या निर्णयामुळे घावनळे गावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असून गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. यांबाबत घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर व आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!