आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले.
या विशेष प्रसंगी भाजप युवा नेते मा. विशालजी परब यांनी पत्नी सौ. वेदिकाताई परब यांच्यासह सदिच्छा भेट दिली. त्यांनी देवीचे दर्शन घेऊन सर्व जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य व प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
या वेळी रघुनाथ उर्फ बबन गणेश नाईक, उल्हास दत्ताराम नाईक, सुदर्शन गोपाळ नाईक, विष्णू अनंत नाईक हे मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे आरोंदा परिसरात भक्ती, एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात आले.