उबाठा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आम्ही फेकलेल्या तुकड्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले द्यावेत..

आमचे आमदार निलेशजी राणे जे काही बोलतात आणि कृती करतात ती पूर्ण विचारांती असते..

वैभव नाईक हेच हिंदू विरोधी लोकांचे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर

कुडाळ : वैभव नाईक यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून घोडगे येथे घडलेल्या घटनेबद्दल पोस्ट केली आहे. वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघात काय दिवे पाजळले ते सगळे जनता जाणून आहे. या वैभव नाईकांना आपल्या मतदारसंघांमध्ये स्वतःची अक्कल लावून विकास कामे करता आली नाहीत त्यांनी आता कोणतेच काम न उरल्याने इतर पक्षांमध्ये नाक घुसत बसण्याचा केविलवान प्रयत्न करत आहेत.
या वैभव नायकांना आमदार असताना विधानभवनातील सुरक्षा रक्षक देखील ओळखत नव्हती त्यांना येथील जनता कसे ओळखणार?? त्यामुळे आपली पुसलेली ओळख मिळवण्यासाठी ते केविलवाणा करत आहेत. अशी टीका जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली.

गेल्या दहा वर्षांमध्ये इथल्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली परंतु या संधीचा तुम्ही स्वतःचे खिसे भरण्यासाठी वापर करून घेतला आणि आपल्या मर्जीतील किंवा घरातील कॉन्ट्रॅक्टरला कामे देऊन ती परस्पर लाटून जनतेवर अन्याय केला हे इथली जनता विसरली नाही.

आता जेव्हा तुम्हाला काहीच काम शिल्लक नाही त्यावेळी तुम्ही आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडून पोस्ट करण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने केलेल्या कामांचे दाखले द्यावेत. सत्तेत असताना पण आणि आता सत्तेत नसताना पण फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी दशतवाद म्हणून ओरड मारण्याची यांची जुनी सवय आहे. पण आपण मात्र स्वतःच्या निवडणुकीत मुंबईतील गुंड लोकांची सेटिंग लावायची. या बाबा भालचंद्र डेव्हलपर्स या नावाने बोगस कम्पनी उभी करून अनधिकृत बांधकामे कोणी उभी केली हे वैभव नाईकांनी जनतेला सांगावे उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नये.

वैभव नाईक ज्या म्हातु मान्येकर यांची पाठराखण करत आहेत त्यानी आपल्या समाजासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी काय दिवे लावलेत एकदा वैभव नाईकांनी त्या भागात जाऊन पहावेत.
वैभव नाईक आणि त्यांच्या उबाठा पक्षाचे सर्वच पदाधिकारी हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन हिंदू विरोधी तत्वांची सातत्याने पाठराखण करत आहेत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याच वैभव नाईकांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी यांच्या स्वतःच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असताना देखील काँग्रेस पक्षाच्या हिंदू विरोधी विचारधारा असलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिले होते हे कुडाळची जनता अजून विसरली नाही. येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांची उत्तरे वैभव नाईक यांना जनतेला निश्चितच द्यावी लागणार आहेत.

वैभव नाईक म्हणतात म्हातु मान्येकर चार वेळा जिल्हा परिषद सदस्य होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते मग आंब्रड संघ नेहमीच मागासलेला का राहिला. इथली राहिलेली विकास कामे गेल्या तीन वर्षात निलेश राणे साहेब यांनी या भागाची जबाबदारी घेतल्यानंतर मार्गी लागली आणि आता इथल्या सर्वसामान्य जनतेला चांगले दिवस यायला लागलेत. असे प्रत्युत्तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिले.

error: Content is protected !!