रुग्णालयाचे काम तसेच रुग्णांच्या समस्यांचा घेतला आढावा….
कुडाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात अनेक समस्या या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दवंगे यांची भेट घेण्याचे निश्चित केले व त्यांना रुग्णालयातील समस्या तसेच मेडिकल कॉलेजच्या सुरू असलेल्या इमारती या अतिशय संथगतीने व दिरंगाईने का होत आहेत अशी विचारणा केली. यावेळी अधिष्ठाता यांनी काही तांत्रिक अडचणी आहेत त्यातील एक म्हणजे सिमेंटचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नव्हता तो सद्या रत्नागिरी जिल्ह्यातील यंत्रणेच्या माध्यमातून सुरळीत करण्यात आला आहे असे सांगितले.त्याचप्रमाणे रुग्णालयात MRI MACHINE उपलब्ध नाही असे श्री. पावसकर यांनी निदर्शनास आणून दिले.नवीन बिल्डिंग झाल्यावर कार्यान्वित होईल असे अधिष्ठाता यांनी सांगितले.त्याचप्रमाणे गेले दोन दिवस रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर समस्या येत आहेत.त्यावर आपण योग्य त्या उपाययोजना करतो,काम सुरू आहे असे मा.अधिष्ठाता यांनी सांगितले.धुलाई कर्मचारी यांचे वेतन हे सप्टेंबर पर्यंत प्राप्त आहे असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला त्याचा आपण ट्रेझरी ऑफिसशी पाठपुरावा करतो असे मा.अधिष्ठाता यांनी सांगितले,त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात रेडिओलॉजिस्ट (Radiologist): क्ष-किरण तज्ज्ञ / प्रतिमाशास्त्रज्ञ (हे डॉक्टर क्ष-किरण (X-ray), सीटी स्कॅन (CT Scan), एमआरआय (MRI) इत्यादींच्या आधारे रोगाचे निदान करतात).त्याचप्रमाणे
न्यूरो सर्जन (Neurosurgeon): मज्जासंस्था शस्त्रक्रियातज्ज्ञ / मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रियातज्ज्ञ (हे डॉक्टर मेंदू, पाठीचा कणा आणि नसांशी संबंधित आजारांवर शस्त्रक्रिया करतात). या दोन्ही विभागांचे प्राध्यापक उपलब्ध नाहीत.आम्ही मागणी केल्यावर ते दुसऱ्या जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात परस्पर पाठविले जातात असे सांगितले एकूणच या कारभाराबाबत जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असे सांगितले.


Subscribe










