दोडामार्ग ते बांदा मार्गावर एस. टी. व दुचाकी यांच्यात अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस टी बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर वय वर्षे ५५ यांचे जागीच निधन झाले. मोटार सायकल याला वाचवण्यासाठी बस चालकाने ब्रेक लावला तरी बस मोटार सायकल याला धडकून रस्ता कडेला असलेल्या दुकानाला धडकली. अपघात माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतापलेल्या नागरीकांनी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. दिलीप हळदणकर यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दोडामार्ग पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

एस टी बस क्रमांक एम. एच. १४ दोडामार्ग ते बांदा मार्गावर पणजी येथील पणजी धाराशिव बी. ०९१६ घेऊन चालक राहुल अंकीत कोल्हापूर हा बस घेऊन जात होता याच दरम्यान हेदूसवाडी इब्रामपूर तिठ्यावर कुडासे वानोशी येथील रहिवासी दिलीप हळणकर हे मोटार सायकल जी. ए. ०३ ए. ८३७३ घेऊन मुख्य रस्त्यावर येत असताना पणजी धाराशिव बस चालक याच्या निदर्शनास येतात बस चालकाने ब्रेक लावून त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण मोटार सायकल धडक बसून काही अंतर फरफटत जाऊन रस्ता कडेला असलेल्या दिपक गवस यांच्या दुकानाला धडक बसली. मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर यांचे जागीच निधन झाले.

सासोली हेदूसवाडी येथे अपघात झाल्यानंतर कुडासे वानोशी येथील नागरिक घटना स्थळी दाखल झाले.घटनास्थळी आलेल्या पोलिसांची नाहक वाद घातला. या नंतर बस चालकाच्या अंगावर चाल केली. पण पोलिसांनी सर्वानी बस मधून बाहेर काढले. या बस मधून कोल्हापूर, पंढरपूर, धाराशिव दरम्यान जवळपास चौदा प्रवासी होते.

अपघातात मृत्यू झाला ते वयोवृद्ध दिलीप हळणकर हे पती पत्नी राहात होते मुलबाळ नाही शिवाय पत्नी मनोरुग्ण आहे. तेच पत्नीची देखभाल करत होते. पण त्यांच्या निधनामुळे पत्नीची सेवा कोण करणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सासोली हेदूसवाडी येथे झालेल्या अपघात मुळे दोडामार्ग बांदा वाहतूक विस्कळीत झाली. अपघात माहिती मिळताच सावंतवाडी एस टी आगाराचे अधिकारी घटनास्थळी उशिरा दाखल झाले. दोडामार्ग पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बस मधून पाठवणे व्यवस्था सुरू होती.

error: Content is protected !!