डॉ. विशाल रेड्डी यांच्या बदलीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची भटकंती

डॉ. विशाल रेड्डी यांना पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हजर करण्याची होतेय मागणी

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विश्वासार्ह डॉक्टर बनलेले डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी येथे बदली झाल्यानंतर रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांनी थेट डॉ. रेड्डी यांचाच शोध घेत प्रत्येक वॉर्डमध्ये विचारणा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

डॉ. रेड्डी यांच्या सेवेमुळे रुग्णालयात उपचाराची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली होती. रुग्णांचा त्यांच्यावर मोठा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे पूर्वी काही प्रमाणात मागे पडलेले होते. मात्र डॉ. विशाल रेड्डी आणि डॉ. पंकज पाटील यांनी येथे रुजू झाल्यानंतर रुग्णसेवेचा दर्जा उंचावला गेला. रुग्णालयातील यंत्रणा अधिक सक्षम झाली आणि जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर सेवा देण्यास सुरुवात झाली. या बदलामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचाही मोलाचा वाटा होता.

दरम्यान, डॉ. रेड्डी यांच्या बदलीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा जिल्हा शल्य चिकित्सकांनी गांभीर्याने विचार करून त्यांना पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!