स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज प्रीमियर लीग (VDPL) स्पर्धे निमित्त बोलत असताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांचे प्रतिपादन
मुंबई : स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज प्रीमियर लीग (VDPL) स्पर्धे निमित्त बोलत असताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांनी
स्व.भरत बोडेकर युवा प्रतिष्ठाने VDPL स्पर्धा आयोजित करून वैभववाडी तालुका धनगर समाजातील शेकडो युवा वर्गाला एकत्रित करून यशस्वी स्पर्धा पार पडल्या बद्दल प्रतिष्ठान च्या पदाधिकारी वर्गाने केलेल्या कार्याचे केले कौतुक केले तसेच विजय संघाना दिल्या शुभेच्छा पराजय झालेल्या संघाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून पुढील वेळी अधिक तयारी करून स्पर्धेला सामोरे जावे.
समाजाची अशीच एकता ठेऊन सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात काम करूया,100 जणांना मागे टाकून 100 पाऊल एकट्याने पुढे जाण्यापेक्षा 100 जणांना एकत्र घेऊन एक एक पाऊल पुढे चला करूया. एकत्रित आपल्याशिवाय समाजाच्या विकासाचे ध्येय आपल्या गाठता येणार नाही.त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन वैभववाडीत तालुका सर्व क्षेत्रात पूर्ण ताकतीने काम करूया असे प्रतिपादन श्री नवलराज काळे यांनी केले.
यावेळी समाजसेवक प्रकाश गुरखे ,समाजसेवक सचिन हुंबे,समाजसेवक श्री नागेश बोडके,समाजसेवक फाले प्रतिष्ठान चे सल्लागार विजय कोकरे,अध्यक्ष चंद्रकांत बोडेकर, अनिल कोकरे,हर्षद फाले व इतर पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe









