कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळचा तारणहार ” नावाने कुडाळेश्वरसह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडर चे प्रकाशन..

कुडाळ शहरातील ” स्वामी फाऊंडेशन ” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम..

कुडाळ शहरातील 8000 कुटुंबीयांकडे रामनवमी उत्सव चे औचित्य साधून 15 दीवसांत घरोघरी पोहचणार केलेंडर..

अध्यक्ष राकेश कांदे यांची माहिती..

कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळचा तारणहार ” नावाने कुडाळेश्वरसह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडरचा प्रकाशन सोहळा माजी जि.प.अध्यक्ष सौ.दिपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार तेली, देवस्थान कमिटी चे गोपाळ राऊळ, प्रसाद कुंटे, महेश राऊळ, जेष्ठ रंगभूषाकार विलास कुडाळकर, लाजरी अध्यक्ष राजू पाटणकर, स्वामी भक्त विनायक केसरकर यांच्या हस्ते सोहळा पार पडला…

यावेळी कुडाळ शहरात स्वामी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत अध्यक्ष राकेश कांदे ,सचिव – शंकर चव्हाण , खजिनदार – रेहान शेख यांनी कुडाळेश्वर मंदिर येथे होत असलेल्या ” रामनवमी उत्सव ” निमित्त ” कुडाळ चा तारणहार ” या नावाने श्री कुडाळेश्वर सह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडर कुडाळ शहरातील 8000 कुटुंबीयांकडे येत्या 15 दीवसांत पोहचवीले जाणार.तसेच ज्या भाविकांना केलेंडर मिळाली नसतील त्यांना 15 एप्रिल नंतर कुडाळेश्वर मंदिर – महेश राऊळ , केळबाई मंदिर -कृष्णा घाडी , भैरव मंदिर धनंजय राऊळ, महालक्ष्मी मंदिर – बाबु गुरव,समादेवी मंदिर – महेश ओटवणेकर,मारूती मंदिर – भुषण मठकर , यांच्या जवळ काही स्वरूपात उपलब्ध असतील.. यावेळी स्वामी भक्त राजेश मांजरेकर , आनंद लाड,आदित्य नाईक, अनिल शिवडावकर,अनुप जाधव, यांच्या सह भाविक उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक राऊळ यांनी केले..

error: Content is protected !!