कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवार दि.२१ मार्च रोजी सायं ७ वाजता मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील रिक्षा सेनेच्या चालकांचा एक लाखाचा विमा उतरविण्यात येणार असून जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. बुधवार दि. २५ मार्च रोजी मालवण शहर शिवसेनेच्या वतीने मालवण शहर येथे सायं ६ वाजता नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आचरा शिवसेना विभागामार्फ़त बुधवार दि. २५ मार्च रोजी चिंदर सातेरी मंदिर येथे सायं. ८ वा. आचरा विभागातील जेष्ठ नागरीकांचा व चिंदर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बारापाच मानकऱ्यांचा सत्कार समारंभ व रात्रौ ९ वा. शिवसेना उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
गुरुवार २६ मार्च रोजी माणगाव शिवसेनेच्या वतीने रामनवमी व वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दत्तमंदिर येथे सरबत वाटप करण्यात येणार आहे. तसेच ओरोस शिवसेना विभागाच्या वतीने अणाव येथील आनंदाश्रय येथे शिधा वाटप आणि झाराप शिवसेनेच्या वतीने सकाळी १० वाजता जीवदान विशेष शाळा झाराप येथे विद्यार्थ्यांना शिधा आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










