युवा संघर्ष मित्र मंडळ वालावल आयोजित खेळ पैठणीचा वालावल सौभाग्यवती कार्यक्रमाचा शुभारंभ

नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांची उपस्थिती

युवा संघर्ष मित्र मंडळ वालावल आयोजित खेळ पैठणीचा वालावल सौभाग्यवती कार्यक्रमाचा शुभारंभ नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व अतुल बंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
वालावल येथे महिलांना विरंगुळा व कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन देण्यासाठी वालावल सौभाग्यवती कार्यक्रम करत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून तर माजी पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी अर्चना बंगे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत आपण आपल्या भागातील विकास कामे असतील ती मार्गी लावण्याचे काम करू असे आश्वासित केले तर रुपेश पावसकर यांनी आपल्या वर विश्वास ठेवून मला अपक्ष म्हणून निवडून देत संपूर्ण जिल्ह्यात नाव लौकिक केले त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही आपल्या सेवेत सर्वोतोपरी हजर राहून अनेक प्रकारचे विकास कामे मार्गी लावून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे असे सांगून उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मंडळाच्या वतीने रुपेश पावसकर व अर्चना बंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सौ रुद्रा रुपेश पावसकर, ग्रामपंचायत सदस्य सौ शुभदा कुंडेकर,आशा सावे अंगणवाडी सेविका आशा सावे,निवृत्ती शिक्षिका मालिनी वालावलकर,देवस्थान समिती उपाध्यक्ष प्रकाश चौधरी,पोस्ट ऑफिस मास्तर सुजया वालावलकर उपस्थित होते
युवा संघर्ष मित्र मंडळ वालावल पदाधिकारी सागर पाटकर, विशाल राऊळ, पूजा राऊळ, भाग्यश्री राऊळ, हेमंत वालावलकर,पद्माकर राऊळ, सुनील खरवडकर, गोविंद पेडणेकर तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ महिला उपस्थित होते

error: Content is protected !!