कुडाळ : पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून या दोन्ही पदांसाठी थोड्याच वेळात अधिकृत अर्ज दाखल केला जाणार असल्याचे समजते.
कुडाळ एमआयडीसी येथील रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सभापतीपदाच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आमदार निलेश राणे यांच्या ‘लिफाफ्यातून’ सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीच्या रणनीतीनुसार पंचायत समितीतील सत्ता संतुलन राखत शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात पदांची विभागणी करण्यात आली असून, सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.