जागतिक महिला दिनाचे औचित्य
कणकवली : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु. सावी मुद्राळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच आदी शक्तींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु. सावी मुद्राळे, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या शिवशक्ती महिला कबड्डी संघ बुरंबावडे या संघाच्या प्रमुख सौ.मानसी दुधवडकर, शंतनु बांदिवडेकर, ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक- प्रणय बांदिवडेकर, जिल्हा खजिनदार हनिफ भाई पिरखान आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी संघटनेच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानीत करण्यासाठी आज महिला दिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रावणी मदभावे यांचा जिल्हा खजिनदार हनिफ भाई पिरखान यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुलाब कलमाची कुंडी देऊन गौरविण्यात आले. आणि कोकण कन्या कु. सावी मुद्राळे हिला कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण व प्रणय बांदिवडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुलाब कलमाची कुंडी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या शिवशक्ती महिला कबड्डी संघ बुरंबावडे या संघाच्या प्रमुख सौ.मानसी दुधवडकर व संपूर्ण टीमचे व प्रोत्साहन देणाऱ्या श्रीमती नारकर यांचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व प्रकाश माईणकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुलाब कलमाची कुंडी देऊन गौरविण्यात आले. तसेच या कबड्डी संघाला मुंबई येथे होणाऱ्या पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन संघटनेच्या वतीने शंतनु बांदिवडेकर यांच्या हस्ते प्रोत्साहन पर पाच हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली.
याप्रसंगी सन्मानार्थ उत्तर देताना सौ.श्रावणी मदभावे यांनी सांगितले की, हा पुरस्कार मला एकटीला मिळाला नसून सर्वांनी दिलेले प्रोत्साहन, पाठिंब्यामुळे मजल मारता आली त्यामुळे हा तुम्हा सर्वांना समर्पित करते असं सांगून यापुढेही हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच सावी मुद्राळे आणि मानसी दुधवडकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले व केलेल्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी संघटनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष प्रकाश माईणकर, अभयसिंह रावराणे, नितीन महाडिक, मंगेश सावंत, संजय खानविलकर, सतीश मदभावे, महेंद्र चव्हाण, किर्ती आंबेरकर तसेच कासार्डे विद्यालयाच्या प्रा. सौ.विधी वैभव मुद्राळे, बुरंबावडे पोलिस पाटील- सौ.मांजरेकर तसेच अन्य महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार महेंद्र चव्हाण यांनी मानले.


Subscribe









