कणकवली : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. शहरात ते ‘कोकि’ या नावानेही ओळखले जात. कांबळे गल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिरातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. तसेच स्थानिक राजकारणातही ते कार्यरत होते.
वैभव नाईक (कुडाळ-मालवणचे माजी आमदार) यांचे ते कट्टर समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वहिनी असा परिवार आहे. युवक कल्याण पतसंस्थेच्या पिग्मी एजंट वैभवी पाटकर यांचे ते पती होत. गुरुवारी दुपारी कणकवलीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन; कणकवलीत हळहळ
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108

Subscribe










