प्लास्टिक साहित्य आणि पाईप्ससह सामानाचे मोठे नुकसान
कुडाळ : तालुक्यातील पणदूर तिठा येथील ‘सिद्धिविनायक एंटरप्राईजेस’ या हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. रत्नदीप सावंत यांच्या मालकीच्या या दुकानाला लागलेल्या आगीत प्लास्टिक साहित्य आणि पाईप्ससह अन्य सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
ही आग इतकी भयानक होती की, दुकानातील लोखंडी पाईप्स आणि अँगल देखील आगीच्या उष्णतेने पूर्णतः वाकून गेले आहेत. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या डीआय वाहनालाही या आगीची झळ बसली असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.

Subscribe










