पावशी मतदारसंघातून दादा साईल यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज तिसऱ्या दिवशीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात वेताळबांबर्डे येथून केली.

तिसऱ्या दिवशीच्या प्रचाराची सुरुवात सकाळी श्री देव वेतोबा मंदिर येथे करण्यात आली. यावेळी दादा साईल यांनी माघी पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या प्रसंगी नागेश आईर, सौ. अश्विनी सावंत, भास्कर गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर दादा साईल यांनी डिगस सुर्वेवाडी येथील आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पावशी व मतदारसंघातील इतर भागांमध्ये ग्रामस्थ व मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला गती दिली. मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दादा साईल यांनी यावेळी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!