कुडाळ : रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी श्री देव महापुरुष मंदिर कडावल येथे सात प्रकारांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तसेच सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २५ जानेवारी
सकाळी ८.३० ते ९.३० वा. पायी दिंडी
सकाळी ९.३० वा. हरिनाम सप्ताह घटस्थापना
दुपारी ४.०० ते ७.०० वा. नामस्मरण जप
सायं ७.०० ते ८.०० वा. हरिपाठ (सद्गुरु श्री. वामनराव पै प्रणित उपासना यज्ञ सादरकर्ते – कडावल बाजार केंद्र )
रात्रौ. ८.०० ते ९.३० वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याचीवाडी ता. कुडाळ यांचे सुश्राव्य भजन बुवा-श्री. ऋषिकेश गावडे
रात्रौ. ९.३० ते १२.३० वा. भव्य वारकरी दिंडी भजन (श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक दिंडी मंडळ आचरा पारवाडी / बुवा श्री. विलास मेस्त्री)
रात्रौ. १२.३० ते १.३० वा. श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ वर्दे बुवा श्री. नरेंद्र मेस्त्री वर्दे ता. कुडाळ
रात्रौ. १.३० ते २.३० वा. गवळदेव प्रासादिक भजन मंडळ डिगस बुवा-श्री. केशव मोहिते
सोमवार दिनांक २६ जानेवारी
सकाळी ९.३० वा. दहीकाला
दुपारी १.०० वा. महाप्रसाद
सायं. ६.३० ते ७.३० वा. हरिपाठ कडावल बाजारपेठ भगिनी
रात्रौ ७.३० ते ९.०० वा. कला सानिध्य प्रस्तुत सुमधुर गीतांचा कार्यक्रम स्वरांजली
रात्रौ ९.०० ते ९.३० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
रात्रौ ९.३० वा. बावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग भृंगश्री अवतार
तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Subscribe








