भारताची आता शुक्रावर भरारी!

इस्रोच्या शुक्रयान मोहिमेला परवानगी

मुंबई प्रतिनिधी: भारताच्या संशोधन संस्थेच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज (दि.२६) परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.इस्रोचे संचालक देसाई म्हणाले, शुक्रयान या व्हीनस ऑर्बिटिंग उपग्रह प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. २०२८ मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चांद्रयान ४ संदर्भातही देसाई यांनी माहिती दिली यावेळी ते म्हणाले, “चांद्रयान 3 चा पाठपुरावा म्हणून चांद्रयान ४ ची कल्पना मांडण्यात आली आहे, जिथे आपण केवळ चंद्रावरच उतरणार नाही. तर चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने घेऊनही परत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शुक्रयान मिशनची वैशिष्ट्ये

• व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) या मिशनसाठी 1,236 कोटी रुपये खर्च येणार आहे.

• हे अभियान पाच वर्षे चालणार आहे.

• या मोहिमेद्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि भूपृष्ठाचा अभ्यास केला जाणार आहे.

• शुक्राच्या वातावरणातील प्रक्रिया आणि रचनेचे विश्लेषण केले जाईल.

• शुक्राचे आयनोस्फियर आणि त्याची गतिशीलता तपासली जाईल.

• सौर किरणोत्सर्गासह शुक्राचा परस्परसंवाद तपासला जाईल.

• शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील उत्क्रांतीविषयक फरक समजण्यासाठी संशोधन केले जाईल.

error: Content is protected !!