बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापुजा

दुपारी १२ वा. आरती व तीर्थ प्रसाद

दुपारी १ वा. महाप्रसाद

दुपारी ३ वा. महिलांच्या फुगड्या

सायं. ४ वा. सांस्कृतीक कार्यक्रम व रेकॉर्ड डान्स

सायं. ६ वा. खेळ पैठणीचा, निवेदक व मालवणी समालोचक बादल चौधरी

रात्रौ. ८ वा. भजन, बुवा श्री. अनिल पांचाळ यांचे सुश्राव्य भजन

रात्रौ. ९ वा. भजन, बुवा श्री. आनंद कानडे यांचे सुश्राव्य भजन

रात्रौ. १० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत, श्री देवी भुमीका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव सावंतवाडी यांचा दशावतार नाट्य प्रयोग देवी मूकाम्बीका

तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!