कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. आगीमुळे घरातील कपडे, गादी, फ्रिज तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.
घराला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे आगीचा प्रसार होण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

Subscribe










