गोवा पासिंगचे सहा डंपर ताब्यात
मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर हॉटेल आराध्य नजिक अनधिकृत वाळू वाहतुकीवर तहसीलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे. २६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.०० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून गोवा पासिंगचे सहा डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांना सागरी महामार्गावरून अनधिकृत गौणखनिज (वाळू) वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सदर डंपर अडवून तात्काळ मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक मालवण यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून डंपरची तपासणी केली असता वाहनांमध्ये वाळू आढळून आली.
सध्या वाळू वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नसताना अनधिकृतपणे वाळूची चोरी करण्याच्या उद्देशाने ही वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मालवण यांनी तहसीलदार मालवण यांना दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर संबंधित सहा डंपर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते तहसीलदार कार्यालय, मालवण यांच्या आवारात लावण्यात आले आहेत. अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीवर धडक कारवाई;
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










