महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी मिळाला न्याय

राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार विविध लाभ

महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला ठाणे औद्योगिक न्यायालयाने सर्व कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनश्रेणी, भत्ते तसेच विविध लाभ मिळणार आहेत. येत्या सहा महिन्यांच्या आदेश लागू करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करीत न्यायालयाचे आभार मानले.

error: Content is protected !!