तरुणाईचा नवा आवाज : पलाश स्वामी मैदानात!
हातकणंगलेत बदलाचा ध्यास, स्वामींसोबत जनतेचा विश्वास
हातकणंगले : हातकणंगले प्रभाग क्रमांक ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) यांच्या तर्फे श्री. पलाश प्रकाश स्वामी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. तरुण, ऊर्जावान, सुसंस्कारित आणि सामाजिक व धार्मिक उपक्रमात सक्रीय सहभाग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख स्थानिक पातळीवर घट्ट झाली आहे.
गावोगावात सतत उपस्थिती, लोकांशी थेट संवाद, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची कार्यपद्धती स्वीकारत स्वामी यांनी मागील तीन महिन्यांपासून प्रचाराची प्रभावी धुरा हाती घेतली आहे. पक्षाकडून त्यांना घड्याळ हे अधिकृत चिन्ह देण्यात आले आहे.
याआधीच्या पंचवार्षिक कालावधीत त्यांच्या भगिनी शुभदा स्वामी या मोठ्या मताधिक्याने नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे स्वामी परिवारावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
या निवडणुकीत पलाश स्वामी यांना दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून ऑफर असल्याची माहिती मिळाली असली तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी प्रभावी संघटन, भक्कम रणनीती आणि व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.


Subscribe










