साऊथ सिनेसृष्टीमध्ये झळकला मराठमोळा चेहरा, सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेचं जागतिक स्तरावर होत आहे कौतुक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेचं जागतिक स्तरावर होत आहे कौतुक

मराठी पाऊल पडते पुढे!! नंदमुरी बाळकृष्ण यांच्या अखंडा २ या तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण मराठमोळा सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेने केले

साताऱ्याच्या पठ्ठ्याने नाव जिंकलं, २०० करोडच्या अखंडा २ तेलुगू चित्रपटाचं केलं चित्रीकरण

महाराष्ट्रातल्या मातीतला मराठमोळा चेहरा सध्या साऊथ सिनेसृष्टीत आपल नाव गाजवत आहे. साताऱ्यातील मराठमोळा सिनेमॅटोग्राफर संतोष देटकेने सुप्रसिद्ध अभिनेता नंदमुरी बाळकृष्ण यांच्या अखंडा २ या तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण केले. अखंडा २ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉच दरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर संतोष यांचं कौतुक होत आहे. अखंडा २ हा तेलुगू चित्रपट येत्या ५ डिसेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे.

सिनेमॅटोग्राफर संतोष देटके साऊथ सिनेसृष्टीच्या पदार्पणाविषयी सांगतात, “मी करिअरची सुरुवात २००८ पासून फोटोग्राफर म्हणून सुरू केली होती. त्यानंतर २०१० ला मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. २०१५ पासून मी साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. मी जवळपास सहा मोठे चित्रपट केले आहेत. सारैनोडू ज्यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन होता. विनय विधेय राम ज्यामध्ये अभिनेता राम चरन हे होते. स्कंदा ही १०० करोडची साऊथ फिल्म केली. आणि आता ५ डिसेंबरला अभिनेता नंदमुरी बाळकृष्ण यांचा अखंडा २ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा खर्च २०० करोड इतका होता. तर अखंड १ व अखंडा २ या दोन्ही चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.”

पुढे तो सांगतो, “मी बोयापती सरांचा ऋणी आहे की कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इतकी मोठी जबाबदारी दिली. मी त्यांचा आभारी आहे. की त्यांनी मला ही संधी दिली. सरांसोबत मी ६ चित्रपट केले. त्या चित्रपटांचे दिग्दर्शक ते होते. खूप मज्जा आली त्यांच्यासोबत काम करताना. खूप नवीन गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या अखंडा २ हा चित्रपट ५ डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट बघावा.”

error: Content is protected !!