पोलिसांचा तपास सुरू
कोल्हापूर : राजारामपुरीतील बळवंत अपार्टमेंट परिसरातून टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा (MH-09-DX-0003) ही पांढऱ्या रंगाची चारचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रमेश धनपाल भोजकर (वय 53, व्यवसाय सिव्हिल इंजिनियर, रा. द्वारका विश्व अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजकर यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आपली इनोव्हा क्रिस्टा कार बळवंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती. परंतु 29 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता मोबाईलवर किणी टोलनाका येथून वाहन गेल्याचा संदेश मिळाल्यानंतर त्यांनी जागेवर येऊन पाहिले असता गाडी गायब असल्याचे निदर्शनास आले.
भोजकर यांनी परिसरात गाडीचा शोध घेतला, मात्र वाहनाचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने कार चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेली कार 2016 मॉडेलची असून तिची अंदाजे किंमत सुमारे 4 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. कारचा चेस क्रमांक MBJGB8EM002002251 आणि इंजिन क्रमांक 2GDA010887 असा आहे.
राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोणाला ही इनोव्हा क्रिस्टा (MH-09-DX-0003) दिसल्यास त्वरित संपर्क साधावा मोबाईल : 9850515365.


Subscribe










