विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती समाजात मोलाची होईल -जयराम पाटील पोलीस उपनिरीक्षक

कणकवली : आज दैनंदिन जीवन खूप धावपळीचे झालेले आहे.या धावपळीच्या जीवनात स्वतः सुरक्षित राहून आपला देश सुरक्षित ठेवण्याचे कार्य विद्यार्थीच घडवू शकतात.रस्त्यावरील प्रवासादरम्यान घ्यावयाची सुरक्षितता आणि स्वतःच्या अभ्यासक्रमावर लक्ष ठेऊन ऑनलाईन होणारे फ्रॉड, मुलांची, मुलींची होणारी फसवणूक ही टाळता आली पाहिजे. विद्यार्थी यांनी कुटुंबातील सर्वांना जागरूक करणे हा एक पर्याय नसून विद्यार्थी यांनी स्वतः लक्ष देणे फार गरजेचे झालेले आहे. आधुनिक युगात विद्यार्थी यांनी अभ्यासक्रमात लक्ष देऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन त्यात यश प्राप्त करावे.असे आवाहन फोंडा ज्युनियर कॉलेज येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमात PSI श्री. जयराम पाटील यांनी केले.

PSI श्री.फाले यांनी महिलांनी घ्यावयाची दक्षता आणि समाजात कोणत्याही फसव्या आमिषाला बळी पडू नये.तसेच स्पर्धा परीक्षा दरम्यान अभ्यासक्रमाबाबत उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.प्रकाश गवस यांनी विद्यार्थी यांनी दैनंदिन जीवनात शिस्त ही खूप महत्वाची आहे.वाहतुकीचे नियम आणि जनजागृती ही विद्यार्थी यांनी स्वतः केली तर नक्कीच होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य होईल.मोटार सायकल चालवताना विद्यार्थी यांनी स्टंट बाजी करणे टाळावे. एखादा विद्यार्थी अपघाती गेल्यास अशा खूप वाईट आणि दुःखद घटनेने त्याचा मित्र परिवार आणि त्याचे आई -वडील आणि पूर्ण कुटुंबाची वाताहात होते.वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालविली तर प्रवास नक्कीच सुखकर होतो. अतिवेगच बऱ्याचदा मृत्यूस कारणीभूत ठरतो. वेगावर नियंत्रण राखून वाहने चालवा असे उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. प्रसाद पारकर आणि विद्यार्थी यांनी विशेष स्वागत करून आभार मानले.

error: Content is protected !!