वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीने राबवला मोफत आरोग्य शिबीर व औषधे वितरण कार्यक्रम

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था धारगळ-गोवा,आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून वेताळ बांबर्डेवासीयांना मिळाल्या वैद्यकीय सेवा

रक्तदान शिबिरास 42 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आज रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांचे मांगल्य मंगल कार्यालय येथे वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ-गोवा,आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ञ्, फिजीशियन, ऑर्थोपेडीक तज्ञ, नेत्ररोगतज्ञ् आदी विविध तज्ञ् डॉक्टर मेडिकल सेवेसाठी सोबत इसीजी एक्स रे व रक्त तपासणी सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाढत्या रक्ताची मागणी लक्षात घेता जय वेतोबा कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यामध्ये 42 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक संवेदनशिलतेचा संदेश दिला. तीनशे हून अधिक ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचा लाभ घेतला घेत ग्रामपंचायतच्या उपक्रमास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक ठाकूर, वेताळ बांबर्डे समृद्ध पंचायतराज अभियान कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडे, सरपंच वेदिका दळवी उपसरपंच शैलेश घाटकर, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गावडे,साजूराम नाईक, दशरथ कदम, सृष्टी सावंत,जागृती गावडे, सुदिव्या सामंत, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप तीवरेकर,स्नेहा दळवी,अवधूत सामंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!