युवासेना शिवसेनेच्या BSNL सेवेच्या विरोधातल्या अनोख्या आंदोलनाला यश…

माणगावमध्ये अखेर BSNL 4 जी चालू

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी BSNL अधिकाऱ्यांचे मानले आभार

🟪 युवासेना शिवसेनेने माणगावमध्ये BSNL ची वारंवार रेंज नसल्यामुळे BSNL विरोधात अनोखे आंदोलन केले होते
🟪 माणगाव खोरे हा डोंगराळ दुर्गम भाग आहे आणि अश्यावेळी आरोग्याची समस्या उद्धवल्यास संपर्क साधण्यासाठी रेंजच नसल्याने खूप मोठी गैरसोय होत होती
🟪 युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी अनोखे आंदोलन करत BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच लक्ष वेधल होत.
🟪 BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत माणगाव मध्ये प्रथमच 4G सेवा सुरु केली त्यामुळे BSNL च्या ग्राहक वर्गात मोठे समाधान मानले जातं आहे
🟪 या आंदोलनाच्या दणक्याने BSNL च्या सेवेबाबत ग्रामस्थांनी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना विभागप्रमुख एकनाथ धुरी तसेच BSNL च्या अधिकारी वर्गाचे आभार मानले
🟪 युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी BSNL च्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच उर्वरीत माणगांब खोऱ्यातील BSNL टॉवर चालू करावेत अशी मागणी देखील योगेश धुरी यांनी केली आहे.

error: Content is protected !!