कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपद उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवलीत सायंकाळी उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांची कॉर्नर सभा होत आहे. या सभेसाठी आमदार निलेश राणे कणकवलीत दाखल झाले आहेत. त्यांनी कणकवलीतील भाजपचे कार्यकर्ते गौरव हर्णे यांची घरी भेट घेतली. गौरव हर्णे यांनी आम. निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. भाजपच्या कार्यकर्त्याला आमदार निलेश राणे यांनी भेट दिल्यानंतर शहरात उलट सुटल चर्चा सुरू झाली. या भेटीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Subscribe










