विनायक राऊत,अरुण दुधवडकर,वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
कुडाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख – अतुल बंगे (कुडाळ विधानसभा), कुडाळ तालुकाप्रमुख – राजन नाईक (आंब्रड, कसाल, नेरुर, डिगस, तेंडोली, जि.प. मतदारसंघ व कुडाळ शहर), कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी), कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी, तेंडोली, नेरूर जि. प.मतदारसंघ व कुडाळ शहर),कुडाळ तालुका संघटक सचिन
कदम (आंब्रड, कसाल, डिगस जि.प.मतदारसंघ) या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नेते,माजी खासदार विनायक राऊत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे. शिवसेना संघटना वाढीसाठी आपल्या पदाचा उपयोग करून पदाला साजेसे काम करण्याचे आवाहन नूतन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.


Subscribe










