शिवसेनेकडून कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी.
कुडाळ : आज एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, सदर बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल झाली. अश्या प्रकारचं कुठलाही स्टेटमेंट श्री. राजन तेली यांनी दिलं नसून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये गैरसमज पसरविण्याचा व वाद लावण्याचा हा प्रकार आहे तरी सदरील घटनेची सखोल चौकशी करून अश्या स्वरूपाचे बनावट संदेश प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर करवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.
यावेळी विनायक राणे यांच्या सोबत नगरसेवक गणेश भोगटे, शिवसेना विभागप्रमुख देवेंद्र नाईक, प्रसन्ना गंगावणे, चेतन पडते आदी उपस्थित होते.