राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

संतोष हिवाळेकर/ पोईप

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर (ता. मालवण) येथे वरई पीक प्रत्यक्षिकावर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मालवण ई. एल. गुरव, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, मंडळ कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर, मंडळ कृषी अधिकारी आचरा हुसेन आंबर्डेकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी विद्या कुबल, पवनकुमार सौंगडे, कृषी सेवक किशोर कदम, स्नेहा खोत, पीक विमा प्रतिनिधी प्रणिल नार्वेकर, पोलीस पाटील स्वप्नील मेस्त्री तसेच वरई पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी वरई पीक लागवडीतील नवनवीन तंत्रज्ञान, जमिनीत सुधारणा, पीक व्यवस्थापन, हवामानानुसार पीक नियोजन आणि विमा योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन वरई पीक प्रात्यक्षिकाचे निरीक्षणही केले. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षणांची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!