पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन
नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा
वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार
वैभववाडी : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील पंचायत समितीची नुतन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा दोन महिन्यापूर्वी कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडला. या नूतन इमारतीमध्ये पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पंचायत समितीत पत्रकारांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकमेव वैभववाडी पंचायत समितीत हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या पत्रकार कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्री, नामदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी एकनाथ पवार, उज्वल नारकर, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, श्रीधर साळुंखे, स्वप्नील कदम, प्राध्यापक एस. एन, पाटील, तसेच भाजपा पदाधिकारी सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, संजय सावंत, पंचायत समितीचे अधिकारी विशाल चौगुले, मनोज सावंत, संतोष टक्के व पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.















 
	

 Subscribe
Subscribe









