दोडामार्ग अपघातातील ती कार आंध्रप्रदेश येथील

कारमधील रक्त पाहता गंभीर विषय असण्याची शक्यता

कारमालकाचे नाव ठेवले गुलदस्त्यात

दोडामार्ग : दोडामार्ग कोनाळ येथे रक्ताने माखलेली संशयास्पद कार ही आंध्र प्रदेश मधील असल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले. मात्र, कार मालकाचे नाव नंबर पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, कारमधील रक्त आणि इतर विषय पाहता गंभीर विषय असल्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले.

ते बोलताना म्हणाले की, काल गुरुवारी सायंकाळी कणकवली येथे एक मरूदेह मिळाला आहे त्याची अद्याप ओळख पटली नाही. त्या मृतदेहाचा या रक्ताने माखलेल्या कारशी काही संबंध आहे काय ? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

error: Content is protected !!