आयुष्यमान आरोग्य मंदिर हेदुळ येथे क्षयरोगासाठी पोषण आहार किट वाटप.


कुडाळ : महाराष्ट्र सरकारने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विविध सरकारी क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात येत असताना हेदुळ येथील कु. कन्हैया नंददीपक गावडे यांच्याकडून टीबीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत क्षय रुग्णासाठी आहार वाटत करण्यात आले . क्षयरुग्ण उपचार कालावधी ६ महिने पोषण आहार देण्याबाबत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी माजी सरपंच नंददीपक गावडे तसेच डॉ. प्रीती नाईक, आरोग्य सेवक राजन गवस, ग्रामस्थ श्री भरत गावडे श्री नंददीपक वसंत गावडे उपस्थित होते. आरोग्यमंदिर हेदुळच्या वतीने कु. कन्हैया गावडे यांचे आभार मानण्यात आले .

error: Content is protected !!